Tuesday, July 29, 2025
Homeअध्यात्मघरातील सुख-समृद्धीसाठी देवघरात या वस्तू अवश्य ठेवा!

घरातील सुख-समृद्धीसाठी देवघरात या वस्तू अवश्य ठेवा!

मित्रांनो प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी, सुख-समृद्धी नांदावी, कोणत्याही प्रकारची अडचण नसावी असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण विविध उपाय करीत असतो. तसेच घरातील कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी आपण मेहनत देखील करीत असतो. तरी देखील आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही. काही ना काही कटकटी, वाद विवाद चालू असतात व त्यामुळे मित्रांनो आपण खूपच त्रस्त होतो. आपल्याला कशामध्येही लक्ष लागत नाही.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे म्हणजे या वस्तू पैकी एक जरी वस्तू तुम्ही आपल्या देवघरांमध्ये ठेवलीच पाहिजे किंवा या सगळ्या वस्तू तुम्ही देव्हाऱ्यामध्ये आपल्या अवश्य ठेवाव्यात. यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदते. कशाचीच कमतरता राहत नाही आणि सर्व काही कटकटी, अडचणी सर्व काही निघून जाते. घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण राहते. तर या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ज्या आपल्याला देवघरांमध्ये ठेवायचे आहेत जाणून घेऊयात.

तर यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे कामधेनूची मूर्ती म्हणजेच गाय वासराची मूर्ती. ती तुम्हाला कुठेही बाजारामध्ये, दुकानांमध्ये अवश्य भेटेल. तर ही मूर्ती आणून तुम्ही देवघरांमध्ये स्थापन करायची आहे आणि दररोज त्याची विधिवतपणे पूजा देखील करून घ्यायची आहे. यानंतरची वस्तू म्हणजे मोरपंख. मित्रांनो श्रीकृष्णांना मोरपंख खूपच आवडते आणि हे मोरपंख आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही मोरपंख देखील आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे आहे आणि तिची पूजा देखील करायची आहे.

यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल. मित्रांनो तुम्हाला कोणत्याही केंद्रांमध्ये किंवा पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये आवश्य गंगाजलची बॉटल भेटेल आणि हे गंगाजल तुम्ही आपल्या घरी आणायचे आहे. तुम्ही देवी देवतांवरती हे गंगाजल शिंपडून नंतर त्यांना स्नान देखील घालू शकता. तसेच आपल्या घरामध्ये देखील तुम्ही गंगाजल शिंपडायचे आहे. यामुळे ज्या काही वाईट शक्ती असतील, नकारात्मक ऊर्जा असेल त्या सर्व बाहेर जातात आणि आपल्या कुटुंबीयांची प्रगती होते आणि कायम सकारात्मतेचे वातावरण आपल्या घरामध्ये राहते.

त्यामुळे एक गंगाजलची बॉटल अवश्य आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे. यानंतरची जी वस्तू आहे ती म्हणजे शाळीग्राम. मित्रांनो प्रत्येकाच्या देवघरांमध्ये शाळीग्राम असणे खूपच महत्त्वाचे आहे. शाळीग्रामला आपल्या शास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे शाळीग्राम हे आपल्या देवाऱ्यांमध्ये अवश्य ठेवायचे आहे. तर मित्रांनो या सांगितलेल्या वरील वस्तूंपैकी तुम्ही एखादी जरी वस्तू आपल्या देवघरांमध्ये ठेवली तरीही चालते. परंतु शक्य होईल तेवढे तुम्ही या वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवणे गरजेचे आहे. यामुळे सुख शांती, समृद्धी, बरकत आपल्या घरामध्ये राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -