Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगविधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार - उद्धव ठाकरे

विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार – उद्धव ठाकरे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भूमिका मांडत आहेत.

संपूर्ण विश्व ज्यांना ओळखतं, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे बेकायदेशीर प्रकार सुरू आहेत. त्याकडं त्यांनी लक्ष द्यावं. मोदींच्या कारभाराचे धिंडवडे जगात निघू नयेत असं आम्हाला वाटतं – उद्धव ठाकरे
हे सगळं प्रकरण अपात्रतेशी संबंधित आहे. त्यामुळं याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीच्या आधारेच होईल – अनिल परब
महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करून राज्यपालांनी बेकायदा सरकार स्थापन केलंय. त्यांच्यावर फसवणुकीचा दावा दाखल केला पाहिजे – उद्धव ठाकरे

आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून विधानसभा अध्यक्षाकंडं जाणार आहोत. मात्र हे अध्यक्षच बेकायदा कसे आहेत याची वेगळी दाद न्यायालयात मागणार आहेत – अनिल परब

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वत: बेकायदा आहेत, हे त्यांनाही माहीत आहे. ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्याच आमदारांनी नार्वेकर यांची निवड केली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे – अनिल परब

पितळाला सोन्याचा मुलामा दिला जात होता, पण पितळ उघडं पडलं. आता त्यांच्याबरोबर गेलेले माझे कार्यकर्ते अडचणीत आले आहेत – उद्धव ठाकरे

सुनील प्रभू यांचाच व्हिप सर्व सदस्यांना लागू होतो. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी निवडही बेकायदा असल्याचं स्पष्ट झालंय

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -