ताजी बातमी ऑनलाईन टीम
संजयनगर मधील हॉटेल पिंक स्टारच्या समोर लावलेल्या गाडीतून लॅपटॉप आणि स्पॅनर सेट असा एकूण १२ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केला. या प्रकरणी निलेश भागोजी लांबोरे (वय ३० रा. करवीर, कोल्हापूर) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, निलेश लांबोरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथील माहेश्वरी कॉलनी मध्ये राहतात. संजयनगर परिसरातील हॉटेल पिंकस्टार समोर त्यांनी त्यांची सॅन्ट्रो कार (क्र. एमएच ०९ एफव्ही २२५२) हि लावून गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी गाडीचा दरवाजा उघडून गाडीत ठेवलेला एक लॅपटॉप आणि स्पॅनर सेट असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लांबोरे हे गाडीकडे परतले असता त्यांना सदर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
सांगली ; गाडीत ठेवलेला लॅपटॉप लंपास
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -