ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’) गुरुवारी (दि. ११) नोटीस बजावली होती. त्यांना ईडीने आज चौकशीला बोलवले होते. त्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली आहे. आयएल आणि एफएसच्या कथित घोटाळ्या प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आला आहे.
माझी राजकीय कारकीर्द ही खुली किताब
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ ) नोटीस बजावली आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेव्हा ते म्हणाले, ” बुधवारी सायंकाळी सहा वाजता मला नोटीस मिळाली. मला शुक्रवारी (दि. १२) चौकशीला बोलवले आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी मला नोटीस पाठवली आहे; पण या कंपनीशी माझा कधी संबंध आला नाही आणि मी कधी कोणाशी या संदर्भात बोललोही नाही. मी चौकशीला सामोरे जाईन, माझी राजकीय कारकीर्द ही खुली किताब आहे.
IL & FS scam : जयंत पाटील यांनी ईडीकडे १० दिवसांची मुदत मागितली
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -