ताजी बातमी ऑनलाईन टीम
शहरात वाढलेली नशेखोरी आणि त्यातून घडणारे गुन्हे यांना
पायबंद घालण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे.
शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर
कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील बुरुड गल्ली येथे
रेकॉर्डवरील गुन्हेगाराला नशेच्या गोळ्या विकताना जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून २५० गोळ्या जप्त करण्यात आल्या. अनिकेत विजय कुकडे (वय २१ रा. बुरुड गल्ली) आणि उमर सलीम महात ( वय २० रा. गवळी गल्ली, सांगली) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीसह जिल्ह्यात नशेबाजीचे प्रमाण वाढले होते. यातून अल्पवयीन मुलांमध्ये
गुन्हेगारी वाढली होती. त्याचाच परिणाम खून, खुनाचे प्रयत्न,
हाणामारी यांसारखे गुन्हे घडत होते. सदरचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक सांगलीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी
पथकातील कर्मचारी विक्रम खोत आणि संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत कुकडे हा बुरुड गल्ली येथे नशेच्या गोळ्या विकण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांन बुरुड गल्लीतील शिवमुद्रा चौक येथे सापळा लावून कुकडे यास जेरबंद केले.
कुकडे आणि महात यांच्या जवळ नशेच्या गोळ्या आढळल्या.
याबाबत सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्याच्याकडे चौकशी
केली असता सदरच्या गोळ्या या कर्नाळ रोडवर राहणाऱ्या शहाबाज शेख उर्फ जॅग्वार यांच्याकडून खरेदी
करून सलीम महात याला ज्यादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली ; नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई २५० गोळ्या जप्त : दोघांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -