मिरजेतील कृष्णा घाट येथे नदीपात्रात बुडाल्याने देवा सुभाष इंगोले (वय ८, रा. गणेशवाडी, सोलापूर) या बालकाचा मृत्यू झाला.
देवा याच्या आई-वडिलांचा यात्रेमध्ये पाळणे-खेळण्यांचा व्यवसाय आहे.व्यवसायानिमित्त हे कुटुंब सध्या मिरज परिसरात आहे. देवा बुधवारी दुपारी आई-वडिलांसोबत धुणे धुण्यासाठी नदीवर गेला होता. पाण्यात उतरल्यानंतर तो खोल पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात येताच आई-वडिलांनी आरडाओरड सुरू केली.
शोधासाठी महापालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाची बोट व आयुष सेवाभावी संस्था, स्पेशल रेस्क्यू फोर्स, गांधी चौक पोलिसांनी नदीत शोध घेतला असता देवाचा मृतदेह नदीपात्रात मिळून आला.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
आई-वडिलांसमोर चिमूरडा कृष्णा नदीमध्ये बुडाला मिरजेतील दुर्देवी घटना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -