सांगलीच्या जत तालुक्यातील पांडोझरी-बाबरवस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांची आंतरजिल्हा बदली झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक भावूक झाले.त्यांच्या भोवती गुरुजी तुम्ही जाऊ नका.. म्हणून विणविण्या आणि आर्त हाक घातली. शिक्षकाची श्रीमंती विद्यार्थ्यांच्या प्रेमावर व मायेवर असते ते या घटनेने दिसून आले.
जत पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक द्विशिक्षिकी वस्ती शाळेत दिलीप वाघमारे हे जून २०११ पासून शिक्षक म्हणून काम करत होते.
तेथे काम करत असताना त्यांनी सह-शालेय उपक्रम, पालक भेटी,शैक्षणिक उठाव उपक्रम, पालक संपर्क,शैक्षणिक जागृती असे उपक्रम राबवले व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शैक्षणिक दर्जा उंचावला. त्या कामाचा विचार करून त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला आहे.वस्तीवरील ४० कुंटुंबे व्यसन मुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे.. ज्ञानरचनावाद, बोलक्या भिंती,वृक्ष लागवड व संगोपन हे उपक्रम ही त्यांनी राबविले आहेत. अशा या धडपडी व उपक्रमशील दिलीप वाघमारे गुरुजी यांची नांदेडला बदली झाली.मुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमा वेळी विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ अतिशय भावूक झाले होते. मुलांच्या मनात गुरुजींच्या बद्दल आदर प्रेम भावना असल्याने निरोपावेळी सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
गुरुजी तुम्ही जाऊ नका; लाडक्या शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांसहित पालकांचेही डोळे पाणावले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -