Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीएक जून पासून 'आपत्ती प्रतिसाद वॉररूम'; संभाव्य आपत्ती निवारणासाठी चांगली महापालिका यंत्रणा...

एक जून पासून ‘आपत्ती प्रतिसाद वॉररूम’; संभाव्य आपत्ती निवारणासाठी चांगली महापालिका यंत्रणा सज्ज

आयुक्त सुनील पवार यांनी आज तातडीने सर्व विभागांचा तयारी आढावा घेतला. संभाव्य आपत्ती लक्षात घेता 1 जूनपासून ‘आपत्ती प्रतिसाद वॉररूम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपआयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त स्मृती पाटील, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, नगर सचिव चंद्रकांत आडके, मालमत्ता व्यवस्थापक नितीन शिंदे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्यासह सर्व सहायक आयुक्त तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

आपातकालीन यंत्रणेच्या तयारीची सज्जता पाहण्यासाठी 16 मे रोजी सांगली कृष्णा नदी, 23 मे रोजी मिरज कृष्णा घाट येथे अग्निशमन विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारती निष्कासित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा, रस्त्यावरील खड्डे बुजवा, अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा, असे आदेश आयुक्त पवार यांनी महापालिका यंत्रणांना दिले. आपत्तीसाठी सर्व विभागांनी यंत्रणा सज्ज ठेवावी. 1 जूनपासून कर्मचाऱयांच्या सुट्टय़ा रद्द कराव्यात, आपत्तीकाळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी निवारा केंद्र सज्ज ठेवावीत, असे आदेशही आयुक्त पवार यांनी दिले. आपत्तीकाळात पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही याची पाणीपुरवठा विभागाने दक्षता घ्यावी आणि आवश्यक ती व्यवस्था करावी. संभाव्य पूर भागात असणारे चेंबर आणि क्रॉस विभाग स्वच्छ करून घ्यावेत. या काळात साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचनाही आयुक्त सुनील पवार यांनी अधिकाऱयांना केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -