शहरातील कोल्हापूर रस्त्यावर महिलेची पर्स हिसडा मारुन लांबविण्याचा प्रयत्न करणार्या तिघांना जमावाने बदडले. त्यानंतर तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यामधील दोघे सराईत गुन्हेगार आहेत. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
सूरज सत्ताप्पा भोसले (पिराईवाडी, कोल्हापूर), वैभव कृष्णांत पाटील (केनवाडी, कोल्हापूर) आणि मुनीब मुस्ताक भाटकर (संजयनगर) अशी संशयितांची नावे आहेत. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साधना जयंत सातपुते या हरिपूर रस्ता परिसरात राहतात. सायंकाळी त्या लेकीसह दुचाकीवरून निघाल्या होत्या. कोल्हापूर रस्त्यावरील विभागीय एस. टी. कार्यालयाजवळ दुचाकी पंक्चर झाली. त्यानंतर शास्त्री चौकाकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी संशयित तिघे बस स्थानकाकडे येत होते. मायलेकींना पाहुन दुचाकी थांबवली. विचारपूस सुरू केली. दुचाकी पंक्चर झाली आहे, असे सांगितल्यानंतर मदत करू का, असे विचारले. सातपुतेंनी नकार दिला व पुढे निघाल्या. त्यानंतर संशयितांनी सातपुते यांचा पाठलाग केला. तिघांपैकी एकाने सातपुतेंच्या पर्सला हिसडा मारला. यावेळी सातपुते यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र पर्स सोडली नाही. परंतु संशयितांनी सातपुते यांना पर्ससह दहा-पंधरा फूट फरफटत नेले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिघांना दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सांगली : पर्ससह महिलेला पंधरा फुट फरफटत नेले;तिघांना बेदम चोप
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -