Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीराष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होत असतानाच जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
या ईडीच्या नोटीशीनंतर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून कारवाईच्या निषेधार्थ डिजीटल बोर्ड लावण्यात आले आहेत. ज्यावर भाजप नेत्यावर इडीची कारवाई दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा, अशी घोषणाही करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ने नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे. या नोटीशीच्या निषेधार्थ जत राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे चक्क डिजिटल बोर्ड लावले आहेत.

“भाजपच्या

नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा,” असा मजकुरचा बॅनरवर लावला आहे. जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा जाहीर निषेध हा डिजिटल बोर्ड लावून केला आहे. राजकीय क्षेत्रात या डिजिटल बोर्डची चर्चा चांगलीच रंगली आहे.आयएल अँड एफएस प्रकरणात पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस बजावली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -