Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रपुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? 'या' नावाने असणार नवीन जिल्हा?

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? ‘या’ नावाने असणार नवीन जिल्हा?

राज्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून पुणे महापालिकेची ओळख आहे.  पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर भौगोलिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठी महापालिका अशी पुण्याची ओळख निर्माण झाली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे जिल्ह्याचे विभाजन करा अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगेंनी केलीय. यासाठी आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिलं आहे. पुणे जिल्ह्याचं विभागजन करुन नवीन जिल्ह्याचं नाव ‘शिवनेरी’ द्या अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

ठाणे  हा राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर  जिल्हा अस्तित्वात आली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या विभागली गेली. सध्या राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्ह्यात पुणे पहिल्या क्रमांकवर, ठाणे जिल्हाय दुसऱ्या क्रमांकवर तर मुंबई उपनगर तिसऱ्या क्रमांकवर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -