ताजी बातमी ऑनलाईन टीम
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने (RR vs RCB) राजस्थानचा 112 धावांनी मोठा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर आता राजस्थान जवळजवळ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 13 सामन्यात राजस्थानचा संघ 12 अंकासह 6 व्या अंकतालिकेत स्थानी आहे. त्यामुळे आता राजस्थानला स्वत:च्या कर्तृत्वावर प्लेऑफमध्ये पोहोचणं अवघड झालंय. एखादी टीम दोन्ही सामने हारण्याची वाट राजस्थानला पहावी लागणार आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी रजवाड्यांच्या दिग्गजांना उद्धवस्त केलं. अशातच आता आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ समोर आला आहे.
बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या. आरसीबीचं हे आव्हान राजस्थान सहज पूर्ण करेल, अशी सर्वांनाच वाटत होतं. 172 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या राजस्थानचा डाव 10.3 षटकांत अवघ्या 59 धावांत गुंडाळ्यात आलाय. त्यामुळे संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या राजस्थानचं वस्त्रहरण करण्यात आलंय, अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. अशातच आरसीबीच्या गोलंदाजीचं देखील कौतूक होताना दिसतंय. अशातच विराट कोहली याने असं काही वक्तव्य केलंय की आरसीबीचा कॅप्टन फाफ डुप्लेसिस पाहतच राहिला…
विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये धमाल मस्ती सुरू होती. त्यावेळी विराटने राजस्थानची खिल्ली उडवली, याचा व्हिडिओ आरसीबीने ट्विटरवर शेअर केलाय. मी बॉलिंग केली असती तर 40 मध्येच ऑलआऊट झाला असता, असं विराट म्हणताना दिसतोय. त्याच्या या वक्तव्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये एकच हशा पिकला. मॅक्सवेल, फाफ, सिराज आणि इतर खेळाडू आनंदाने सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.
ऐतिहासिक विजयानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल; Virat kohli च्या वक्तव्याने कॅप्टनही शॉक!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -