Sunday, September 8, 2024
Homeक्रीडायंदाच्या पर्वात प्ले-ऑफमध्ये गुजरात टायटन्स फिक्स!

यंदाच्या पर्वात प्ले-ऑफमध्ये गुजरात टायटन्स फिक्स!


गुजरात टायटन्स संघाने सनरायजर्स हैदराबाद संघावर विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. या विजयासह आता गुजरातने आपली जागा फिक्स केलीच. तर आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्स संघासाठीही मोठी संधी आहे. गुजरातने विजय मिळवल्यावर मुंबईला नेमकी कशी काय संधी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या नेमकं कसं असणार आहे समीकरण.

गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये आपलं पहिलं स्थान पक्कं केलं आहे. पॉइंट टेबलवर नजर मारलीत तुमच्या लक्षात येईल की सीएसकेचे 18 गुण काही होणार नाहीत. मुंबईने राहिलेल्या सामन्यात विजय मिळवला तर मुंबईला दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी आहे. मुंबईचा मंगळवारी सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि शेवटचा हैदराबादसोबत आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये पलटणला विजय मिळवावा लागणार आहे. सीएसकेचा आता दिल्लीसोबत सामना असून त्यांनी विजय मिळवला तरी 17 गुण होणार आहेत.

गुजरात संघाची सुरूवात खराब झाली होती. भुवनेश्वर कुमारने साहाला शून्यावरच  माघारी पाठवलं होतं. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनंतर गुजरातचे इतर फलंदाज ढेपाळले. भुवीने पाच विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. 20 ओ्व्हरमध्ये गुजरातने 188 धावा केल्या होत्या.

हैदराबाद संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर त्यांची सुरूवात एकदम खराब झाली होती.  अभिषेक शर्मा 4 धावा, राहुल त्रिपाठी 1 धाव, एडन मार्कराम 10 धावा, अब्दुल समद 4 धावा, सनवीर सिंग 7 धावा या सुरूवातीच्या खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. फक्त हेनरिक क्लासेन 64 धावा आणि भुवनेश्वर कुमार 27 धावा यांनी झुंज सुरू ठेवली होती. पण दोघे संघाला काही विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले नाहीत. आज झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सनंतर स्पर्धेबाहेर होणार हैदराबाद दुसरा संघ ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -