Friday, February 7, 2025
Homeअध्यात्ममोठा मंगळवार स्वामींची विशेष सेवा; सर्व अडचणी दूर, इच्छा होणार पूर्ण !

मोठा मंगळवार स्वामींची विशेष सेवा; सर्व अडचणी दूर, इच्छा होणार पूर्ण !

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे व्रत उपवास हे करीतच असतात. अगदी मनोभावे श्रद्धेने व्रत उपवास करून आपल्या घरातील सर्व अडचणी, दुःख, संकटे दूर व्हावी अशी मनोमन प्रार्थना देखील करीत असतात. तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खूप सारे इच्छा असतात परंतु इच्छा पूर्ण होण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, बाधा उत्पन्न झाल्यामुळे आपल्या त्या इच्छा अपूर्णच राहतात.

तर आज मी तुम्हाला स्वामी महाराजांची अशी एक विशेष सेवा सांगणार आहे. जी तुम्हाला करायची आहे. ही सेवा केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. तसेच तुमच्या घरातून सर्व अडीअडचणी दूर होतील. तुमचे घर हे कायम सुख समृद्धीने नांदेल. तर या चमत्कारिक सेवेमध्ये तुम्हाला स्वामी महाराजांच्या एका मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे आणि या मंत्राचा जप तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता.

म्हणजे सकाळी, दुपार, संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही हा जप करीत असताना पहिल्यांदा तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. मनोभावे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या सर्व अडचणी, दुःख दूर व्हावी तसेच आपल्या इच्छा स्वामी महाराजांना बोलून दाखवायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे. तर तो मंत्र काहीसा असा आहे.

ओम योगी राजेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ म्हणजेच 108 वेळा करायचा आहे. 108 वेळा म्हणजेच एक माळ या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या मंत्राचा जप जर केला तर यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी, दुःख, संकटे स्वामी महाराज दूर करतील. तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील. तर ही अशी ही मंगळवारची स्वामी महाराजांची विशेष अशी चमत्कारिक सेवा तुम्ही अवश्य करून पहा. अनुभव तुम्हाला नक्कीच येतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -