IPL 2023:मंगळवारी (16 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला 5 धावांनी पराभूत केले.
लखनऊच्या या विजयासाचा मोहसिन खान नायक राहिला. त्याने गोलंदाजी केलेले अखेरचे षटक या सामन्याच्या निकालासाठी महत्त्वाचे होते. दरम्यान, मोहसिनसाठी गेले काही महिने चढ-उताराचे राहिले आहेत.
या सामन्यात मुंबईला(Mumbai) विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना मोहसिन खानने गोलंदाजी करताना केवळ 5 धावा दिल्या. त्यामुळे लखनऊला विजय मिळवणे सोपे गेले.
दरम्यान, या सामन्यानंतर मोहसिनने खानने(Mohsin Khan) खुलासा केला की या सामन्यापूर्वी त्याचे वडील 10 दिवस अतिदक्षता विभागात (ICU) होते. तसेच त्याला दुखापतीमुळे जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.
मोहसिनच्या खांद्यावर ऑक्टोबर 2022 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्याला बरेच महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते.
वडिलांना ICU मधून काढलं इकडे ठरला मोहसीन मुंबई विरुद्ध लखनऊ चा हिरो
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -