विटा पालिकेत इथून पुढे कसलाही भ्रष्टाचारी कारभार होणार नाही, याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही देत विटा पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने अनिल पवार, राजेंद्र शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला (Female)आणि पुरुष (Male)कर्मचाऱ्यांनी विटा पालिकेत आज (दि.१७) गोमूत्र शिंपडले.आणि संशयित लाचखोर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचा निषेध केला.
विटा पालिकेचे मुख्याधिकारी विनायक विजय औंधकर मंगळवारी (दि.१६) शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाकडून दोन लाखांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले होते. बांधकामाचा परवाना देण्यासाठी त्यांनी दोन लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विटा शहरातील विविध भागात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. आज पालिकेत राजेंद्र शितोळे (Rajendra shitole)यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या इमारतीच्या आतील भागात गोमूत्र शिंपडून मुख्याधिकारांचा तीव्र शब्दांत घोषणा देत निषेध केला. तसेच लाचलुचपत विभागाकडे तक्रार केलेल्या संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा सत्कार केला.
यावेळी गजानन निकम, भरत कांबळे, मैनुद्दीन पठाण, हर्षल निकम, पंकज दबडे, श्रीकांत कोरटे, समीर शेख, सचिन महापुरे, दिनेश साबळे, पूनम महापूरे यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, मागील तीन महिन्याच्या काळात पालिकेच्या २१ कंत्राटी कामगारांना मुख्याधिकारी औंधकर यांनी कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय काही कंत्राटी ठेकेदारांकडूनही औंधकर हप्ते मागत होते, असेही यावेळी कर्मचाऱ्यांने सांगितले.दरम्यान, सांगली येथे न्यायालयात विटा नगरपालिकेचे संशयित लाचखोर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Sangli:विटा नगरपालिकेत गोमूत्र शिपडून लाचखोर मुख्यमंत्र्यांचा निषेध
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -