Thursday, February 6, 2025
HomeमनोरंजनKhatron Ke Khiladi 13 :  खतरो के खिलाडी मध्ये पुन्हा दिसणार शिव...

Khatron Ke Khiladi 13 :  खतरो के खिलाडी मध्ये पुन्हा दिसणार शिव आणि त्याच्या ‘या’ मित्राची दोस्ती!

अब्दु रोजिक खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी होणार असल्याच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. बिग बॉस 16 मध्ये अब्दू आणि शिवचे बॉन्डिंग चाहत्यांना चांगलेच आवडले होते. आता पुन्हा एकदा शिव आणि अब्दुलची मैत्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मात्र, यावेळी अब्दू या शोमध्ये स्पर्धक म्हणून नाही तर शिवचा समर्थक म्हणून सहभागी होणार आहे. होय, अब्दु रोजिक हा रोहित शेट्टीच्या शोमध्ये पाहुणे सेलिब्रिटी म्हणून सहभागी होणार आहे.Khatron Ke Khiladi 13

नुकताच वादाता सापडला होता अब्दु

अब्दु रोजिक यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अब्दू यांनी नुकतेच एका वादावर अधिकृत निवेदन जारी केले. हा वाद त्याच्याबद्दल लिहिलेल्या एका लेखामुळे झाला होता, ज्यामध्ये त्याच्याकडे गोळ्यांनी भरलेली बंदूक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी आपल्या निवेदनात ही बातमी फेटाळून लावली आणि खोट्या अफवा पसरवल्याबद्दल पत्रकारावर सडकून टीका केली.

शिवला करतोय सपोर्ट

अब्दू रोजिक आणि साजिद खान दोन दिवसांपूर्वी फहमन खानच्या एका कार्यक्रमात स्पॉट झाले होते. खतरों के खिलाडीबद्दल बोलताना ते दोघे म्हणाले की, “त्यांना अर्चना आणि शिव दोघांनाही शुभेच्छा द्यायची आहेत पण त्यांना माहित आहे की हा शिवचा शो आहे. बिग बॉसच्या घरातही शिवा टास्कमध्ये चमकदार कामगिरी करत असे. त्यामुळे शिव खतरों के खिलाडीमध्ये चांगली कामगिरी करू शकतो.Khatron Ke Khiladi 13

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -