Tuesday, April 30, 2024
Homeकोल्हापूरपालकमंत्री सतेज पाटील यांनी परस्पर समित्यांची नावे नगरसेवकांकडून का मागितली?

पालकमंत्री सतेज पाटील यांनी परस्पर समित्यांची नावे नगरसेवकांकडून का मागितली?


शिवसेनेला कुठे डावलले हे दुधवडकरांनी लेखी द्यावे,’ असे वक्तव्य पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांचे हे वक्तव्य हास्यास्पद आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी नेहमीच संपर्क साधत असाल तर त्यांच्या माघारी शिवसेनेच्या नगरसेवकांना जेवणासाठी बोलावून त्यांच्याकडून समित्यांसाठी परस्पर नावे मागण्याचे कारण काय? अशी विचारणा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री पाटील यांना पत्रकाद्वारे केली आहे.


काँग्रेसला जिल्हा नियोजन समितीतून 11(cr) कोटी व नगरविकास विभागाकडून 10 कोटी(cr), राष्ट्रवादीला 25 कोटी(cr) निधी दिला आहे. तसेच शिवसेनेलाही 15 कोटींचा निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. त्याचे श्रेय पालकमंत्री पाटील यांनी घेऊ नये. कोल्हापूरच्या विकासासाठी 15 कोटींचा निधी मिळण्यासाठी मी पाठपुरावा केला.


त्यामुळे निधी मिळाल्याचे दुःख पालकमंत्री पाटील यांना झाले. निधी मिळू नये म्हणून पालकमंत्री पाटील हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना का भेटले? जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेच्या अनुसूचित जाती-जमातीच्या प्रभागासाठी मंजूर झालेला 11 कोटींचा निधी फक्त काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात दिला.


यावेळी पालकमंत्री पाटील यांना महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीची आठवण का झाली नाही?
राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर माझी नियुक्ती 2019 मध्ये झाली. आमदार प्रकाश आबिटकर यांचीही नियुक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाली आहे. त्याचे श्रेय इतरांनी घेऊ नये. ‘गोकुळ’मध्येही शासन नियुक्त सदस्य म्हणून जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नियुक्तीचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनीच दिले.


तरीही तांत्रिक बाबीचे कारण काढून नियुक्ती का रखडवली? पालकमंत्री पाटील यांनी शिवसेनेचे बोट धरूनच विधानसभेत प्रवेश केला; परंतु आता ते विसरले आहेत. मात्र, पालकमंत्री पाटील यांच्यावर शिवसेनेचे उपकारच आहेत, असेही क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -