राजस्थान रॉयल्स टीमने संजू सॅमसन याच्या नेतृत्वात पंजाब किंग्स टीमचा त्यांच्याच घरच्या मैदानात धर्मशाळामध्ये 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. राजस्थानने 188 धावांचं विजयी आव्हान हे 3 बॉल राखून आणि 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडीक्कल आणि शिमरॉन हेटमायर ही तिकडी राजस्थानच्या विजयाची शिल्पकार ठरली. राजस्थानने या विजयासह मुंबई इंडियन्सला पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. राजस्थानला आरसीबीच्या तुलनेत नेट रनरेट चांगला करण्यासाठी 188 धावांचं आव्हान हे 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण करायची आवश्यकता होती. मात्र राजस्थानला ते जमलं नाही. मात्र यानंतरही राजस्थानच्या प्लेऑफच्या आशा या जरतरच्या समीकरणावर कायम आहेत.IPL 2023
दरम्यान पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यानंतर पर्पल कॅप आणि ऑरेन्ज कॅप कुणाकडे आहे, हे आपण जाणून घेऊयात. ऑरेन्ज कॅप ही आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस याच्याकडेच कायम आहे. तर यशस्वी जयस्वाल याने 50 धावांच्या अर्धशतकी खेळीसह तिसऱ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
ऑरेन्ज कॅप ( Orange Cap) कुणाकडे?
यशस्वीने गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याला मागे टाकलं. त्यामुळे शुबमनची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आरसीबीचा विराट कोहली आणि सीएसकेचा डेव्हॉन कॉनवे आहेत. Orange Cap
पर्पल कॅप( Purple Cap) कुणाच्या डोक्यावर?
तर पर्पल कॅपमधील पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमी याच्याकडे पर्पल कॅप कायम आहे. राजस्थानच्या युझवेंद्र चहल याला 3 विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी होती. मात्र चहल याला पंजाब किंग्स विरुद्ध एकही विकेट घेता आली नाही. चहलला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. त्यामुळे चहल तिसऱ्या क्रमांकावरच कायम आहे. तर मुंबईचा पियूष चावला चौथ्या आणि केकेआरचा वरुण चक्रवर्थी पाचव्या क्रमांकावर आहे. Purple Cap