सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडेनंतर आणखी एक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी सज्ज झाली आहे.अजय देवगणच्या चित्रपटातून ती पदार्पण करणार आहे. त्यात अजय देवगणसोबत अभिनेत्री डायना पेंटी देखील दिसणार आहे. ते पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. तसेच याच सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज दिसत आहे.Starkids will enter
दिग्दर्शक अभिषेक कपूरचा आगामी अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपट याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिषेक कपूरच्या या चित्रपटातून रवीना टंडनची मुलगी राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणचीही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री होत आहे.Starkids will enter
‘दृश्यम 2’ अभिनेता अजय देवगणही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात राशा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चंदीगढ करे आशिकी’ नंतर चित्रपट निर्माता अभिषेक कपूरने रवीना टंडनची मुलगी राशाला आपल्या नवीन चित्रपटासाठी साइन केले आहे. या चित्रपटातून अभिषेक बॉलिवूडचे दोन मोठे स्टार किड्स राशा टंडन आणि अमन देवगणला लाँच करणार असल्याचे बोलले जात आहे. आता सर्वांच्या नजरा राशावर आहेत, जिच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राशाचे चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.अमन देवगण आणि राशा यांची ही नवीन आणि सुंदर जोडी या वर्षातील मोस्ट अवेटेड लॉन्चिंग म्हणून बोललं जातं आहे.मात्र, चित्रपटाची कथा आणि नाव याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.Starkids will enter