एमएस धोनीच्या ( MS Dhoni )नेतृत्वातील चेन्नईने गुजरातचा पराभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने पहिल्यांदाच गुजरातचा पराभव केला. याआधी झालेल्या तिन्ही सामन्यात गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नईने दहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईचा संघ २८ मे रोजी पाचव्या आयपीएल चषकासाठी मैदानात उतरेल. CSK IPL 2023 Final
चेन्नईने ( CHK) दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी हराकिरी केली. गुजरातचा डाव २० षटकात १५७ धावांत संपुष्टात आला. गुजरातकडून शुभमन गिल याने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. त्याशिवाय अखेरीस राशिद खान याने ३० धावांची खेळी करत करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. पराभवानंतर आता गुजरातचा संघ क्वालिफायर : मध्ये गेला आहे. शुक्रवारी २६ मे रोजी गुजरातचा संघ अहमदाबादच्या मैदानावर क्वालिफायर २ चा सामना खेळेल. लखनौ आणि मुंबई यांच्यातील विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये गुजरातसोबत भिडणार आहे. आह. १७३ धावांचा गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल आणि राशिद खान यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. गुजरातच्या ( GT) फलंदाजांनी हराकिरी केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. वृद्धीमान साहा याने विकेट फेकली.CSK IPL 2023 Final
त्यानंतर हार्दिक पांड्याही लगेच बाद झाला. दासुन शनाका आणि शुभमन गिल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण शनकाला जाडेजाने तंबूत धाडले. त्यानंतर डेलिड मिलर आणि राहुल तेवातियाही लगेच तंबूत परतले. विजय शंकरलाही इम्पॅक्ट पाडता आला नाही. विजय शंकर याने १४ १४ तर र शनाका याने १७ धावांची खेळी केली. शुभमन गिल आणि शि खान यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या ओलांडता आली नाही. भन्नाट फॉर्मात असलेल्या गिल याने ४२ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि चार चौकाराचा समावेश होता. तर तर राशिद खान याने ३० धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. CSK IPL 2023 Final
दीपक चहर, महिश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे याने एक विकेट घेतली. रविंद्र जाडेजा आणि महिश तिक्ष्णा यांनी मधल्या षटकात धावांना रोखले. त्याप्रमाणे गुजरातची मधली फळी उखडून टाकली.CSK IPL 2023 Final