मित्रांनो, आपण स्वामींच्या अनेक प्रकारचे सेवा करीत असतो म्हणजेच केंद्रामध्ये, मठांमध्ये जाऊन विविध प्रकारच्या सेवा या करीत असतो. तसेच बरेच जण अनेक मंत्रांचा जप देखील करीत असतात. जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व काही अडीअडचणी दूर होतील. आपल्या ज्या काही इच्छा मनी असतील त्या पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना देखील आपण स्वामी महाराजांकडे करत असतो. तसेच स्वामी महाराज हे आपल्या भक्तांच्या सर्व अडचणीमध्ये त्यांची साथ देखील दे म्हणजेच त्या दुःखातून त्यांना बाहेर देखील काढत असतात.
भक्तांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करीत असतात म्हणजेच एक प्रकारचा स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद भक्तांच्या पाठीशी असतो. तर आज मी तुम्हाला बुधवारची अशीच स्वामींची एक विशेष सेवा सांगणार आहे. मित्रांनो या सेवांमध्ये तुम्हाला एका मंत्राचा अगदी मनोभावे करायचा आहे. तर तुम्ही या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करू शकता. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे.
तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ज्या वेळेस देवपूजा करता त्यावेळेस दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर तुम्ही देवघरासमोर म्हणजे स्वामींच्या मूर्ती समोर बसायचे आहे आणि हात जोडून स्वामींच्या या मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र काहीसा असा आहे
ओम शरणागतकवचाय नमः
या मंत्राचा तुम्ही एक माळ करायचा आहे. या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. अशाप्रकारे अगदी मनोभावे तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्या काही अडचणी असतील, इच्छा असतील त्या स्वामी महाराजांना तुम्ही बोलून दाखवायचे आहेत. यामुळे स्वामी महाराज आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व अडचणी दूर करतील आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण करतील.
तर अशाप्रकारे बुधवारची ही स्वामींची विशेष सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस करू शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक झालेला दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.