Sunday, December 22, 2024
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी दणदणीत विजय, पलटणची क्वालिफायर 2...

मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी दणदणीत विजय, पलटणची क्वालिफायर 2 मध्ये धडक

IPL 2023: 16 व्या मोसमात एलिमिनिटेर (Eliminiter) सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईमधील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

दोन्ही संघ या हंगामात साखळी फेरीत आमनेसामने आले होते. लखनऊने त्या रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबईवर शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावांनी विजय मिळवला होता. लखनऊचा हा मुंबईवर तिसरा विजय होता. मुंबईला लखनऊ विरुद्ध अद्याप एकदाही विजय मिळवता आलेला नव्हता. मात्र मुंबईने या एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवत मागचा सर्व हिशोब चुकता केला आहे. मुंबई या विजयानंतर क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे.मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians)एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबई आता क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबईने पहिले बॅटिंग करताना लखनऊला विजयसाठी 183 धावाचं आव्हान दिलं. मात्र पलटणची शानदार फिल्डिंग आणि आकाश मढवाल याच्या 5 विकेट्ससमोर लखनऊ 16.3 ओव्हरमध्ये 101 धावांवर ऑलआऊट झाली.लखनऊने 15 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावले आहेत. रवि बिश्नोई आऊट झाल्यानंतर दीपक हुड्डाही रनआऊट झाला आहे. त्यामुळे लखनऊची 15 ओव्हरमध्ये 9 बाद 100 अशी स्थिती झाली आहे.पलटणने लखनऊला सातवा आणि रन आऊटने दुसरा झटका दिलाय. कृष्णप्पा गौतम चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. रोहित शर्माने कडक थ्रो करत गौतमला स्ट्राईक एंडवर रनआऊट केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -