Friday, July 25, 2025
Homeसांगलीमुलानेच केली जन्मदात्या वडिलांची हत्या; उसणे पैसे मागितल्याने ट्रॅक्टरखाली चिरडलं

मुलानेच केली जन्मदात्या वडिलांची हत्या; उसणे पैसे मागितल्याने ट्रॅक्टरखाली चिरडलं

Sangli: नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मुलांनेच जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. वडिलांनी मुलाला दिलेले उसने पैसे ही घटना बुधवारी घडली आहे.ही घटना सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील बेडग या गावात आज (बुधवार) घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेतील आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलगा लक्ष्मण आकळे याने वडिलांकडून 80 हजार रुपये उसने घेतले होते. वडील दादू आकळे आज सकाळी दिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. यावेळी मुलगा लक्ष्मण याने वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर (Tracter)घातला. त्यात त्यांचा मृत्यू(Death) झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला.या घटने नंतर मिरज ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेत. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता. मुलगा लक्ष्मण आकळे याने हा प्रकार केल्याचं काही लोकांनी सांगितले. त्यानंतर मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. मिरज ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -