चेन्नईने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत या सामन्यात विजय मिळवला. यासोबतच अंतिम फेरीतील त्यांची जागा नक्की झाली. मात्र, चेन्नईचा कर्णधार एम. एस. धोनी हा या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. चेन्नई धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला असला तरी, आता संघाचा कर्णधार धोनी याला या सामन्या दरम्यान केलेली एक चतुराई महागात पडू शकते. धोनीने या सामन्यात मथिशा पथिराना याला गोलंदाजी देण्यासाठी तब्बल पाच मिनिटे वेळ खर्च केला होता. IPL 2023
पथिराना विश्रांती घेतल्यानंतर डावातील सोळावे षटक टाकण्यासाठी आलेला. मात्र, नियमानुसार मैदानावर नऊ मिनिटे वेळ घालवल्याशिवाय त्याला गोलंदाजी करता येणार नव्हती. त्याआधी तो मैदानावर आल्याचे केवळ चार मिनिटे झाली होती. हा कालावधी पूर्ण करण्यासाठी धोनी व चेन्नईच्या खेळाडूंनी तब्बल पाच मिनिटे पंचांशी चर्चा केली. या काळात नऊ मिनिटांचा वेळ पूर्ण झाला व पथिराना गोलंदाजी करू शकला. IPL 2023
त्याचवेळी या सामन्यात चेन्नई संघ निर्धारित वेळेपेक्षा संथ गतीने षटके टाकताना दिसला. नियमानुसार कोणत्याही कर्णधाराने दोन वेळा अशी चूक केल्यास त्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते. धोनीवर यापूर्वी हंगामात अशी वेळ आली नव्हती. मात्र, पथिरानाला गोलंदाजी देण्यासाठी वेळ दवडल्यामुळे पंचांनी सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असेल तर, धोनीवर कारवाई केली जाऊ शकते. अशात त्याच्यावर एका सामन्याची म्हणजेच अंतिम सामन्याची बंदी लादली जाईल. IPL 2023