Friday, February 7, 2025
Homeसांगलीकवठेपिरानमध्ये दरोडा : ९ लाखांचा मुद्देमाल लंपास! Sangli News

कवठेपिरानमध्ये दरोडा : ९ लाखांचा मुद्देमाल लंपास! Sangli News

मिरज ( Miraj) तालुक्यातील कवठेपिरान येथे पत्र्याच्या शेडमध्ये भाड्याने राहत असलेल्या कुटुंबियांवर सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकून दगडाने मारहाण करत १८ तोळे सोन्याचे, चांदीचे दागिने, १ लाख रुपये रोख आणि मोबाईल असा एकूण ८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर दरोड्याची घटना ही शुक्रवारी पहाटे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास कवठेपिरान मधील मगदूम गल्लीत घडली.

या प्रकरणी सौ. तरन्नुम शिफा मुजावर ( वय ३० रा. दुधोंडी ता. पलूस) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर अधीक्षक तुषार पाटील, उपअधीक्षक प्राणिल गिल्डा, पोलीस निरिक्षक शिवाजी गायकवाड, सतीश शिंदे यांनी भेट दिली. याबाबत माहिती अशी कि, कवठेपिरान मधील सोसायटी समोर रफिक मगदूम यांचे कुटुंबीय राहते. रफिक यांचा टेलरिंगचा गावामध्ये व्यवसाय आहे. सध्या रफिक मगदूम यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने शेजारीच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. रफिक मगदूम यांची मुलगी फिर्यादी तरन्नुम मुजावर या सुट्टीसाठी काही दिवसांपूर्वी कवठेपिरान येथे माहेरी आल्या होत्या. गुरुवारी रात्री जेवण करून रफिक मगदूम आणि त्यांचा मुलगा हे दोघे त्यांच्या दुकानात झोपले होते तर तरन्नुम मुजावर आणि त्यांच्या आई भाड्याच्या खोलीत झोपल्या होत्या. Sangli News

यावेळी पहाटे अडीच ते पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास सहा युवकांची टोळी त्यांच्या घराजवळ आली. घराच्या खिडकीतून दरवाजाला आतून लावलेली कडी त्यांनी काढली आणि घरात घुसले. यावेळी तरन्नुम आणि त्यांच्या आई उठल्या असता सहा जणांपैकी एकाने तरन्नुम यांना दगडाने मारून जखमी करत आरडाओरडा करू नका अशी धमकी दिली. घरात असलेल्या तिजोरीचे लॉकर उघडून त्यात ठेवलेले सोन्याचे चांदीचे दागिने, दोन मोबाईल, रोख एक लाख असा एकूण ८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल लंपास करत घराला बाहेरून कडी लावून पोबारा केला. Sangli News

दरोडेखोरांनी चोरून नेलेल्या मुद्देमालामध्ये ६० हजारांचा सोन्याचा नेकलेस, १ लाख २० हजारांचा चार तोळ्याचे गंठण, ६० हजारांचे दीड तोळ्याचे मिनी मंगळसूत्र, १२ हजारांची तीन ग्रॅम सोन्याची अंगठी, २ लाखांचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ४० हजारचे एक तोळ्यांचे कानातील रिंग, २८ हजारांचे मिनी मंगळसूत्र, ७ ग्रॅम च्या २८ हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ७ ग्रॅम २८ हजारांचे दोन सोन्याचे वेधण, ४० हजारांची एक तोळे सोन्याची चेन, २ हजारांचे दोन चांदीचे पैंजण, २ हजारांच्या चांदीच्या अंगठ्या, २ हजारांचे पैंजण जोड, पाच हजारांचा जिओ मोबाईल, रेडमी मोबाईल आणि रोख रक्कम एक लाख रुपयांचा समावेश आहे.
केला.

काही वेळाने तरन्नुम आणि त्यांच्या आईने आरडाओरड केली असता रफिक मगदूम यांच्यासह परिसरातील नागरिक धावत आले. तेंव्हा सदरचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, शहर विभागाचे प्रभारी उपअधीक्षक प्रवीण गिल्डा. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकांनी धाव घेतली. याठिकाणी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते. श्वान हे घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर घुटमळले. Sangli News

दरम्यान, दरोडेखोरांनी घरापासून काही अंतरावरील एका शेतात घरातील साहित्य फेकून दिले असल्याचे निदर्शनास आले. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात केली असून परिसरातील सीसीटीव्ही, खबरी आणि इतर माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. दरोडा टाकणारी सहा जणांची टोळी ही सराईत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कवठेपिरान मध्ये पडलेल्या या दरोड्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.Sangli News

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -