ताजी बातमी ऑनलाईन टीम
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यादिवसांत पाच दिवस महिलांना असह्य त्रास होतो. पोटदुखी आणि कंबरदुखीमुळं महिला त्रस्त होतात. तर, काही जणींना हे पाच दिवस इतके कठिण जातात की ते थेट पेनकिलरची गोळी घेतात. पण मासिक पाळीत काही योगासनांचा सराव केल्यास दुखणं कमी होऊन तुमचा मूडही फ्रेश होतो.
मासिक पाळीच्या काळात जानुशीर्षासन हे आसन केल्यास फायदा होऊ शकतो. हे आसन करताना योगा मॅटवर पाठ ताठ ठेवून सुखासनमध्ये बसा. त्यानंतर दोन्ही पाय लांब करा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवावा. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या जांघेवर ठेवावी. डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवून ठेवा. आता हळूवार शरीराच्या वरच्या भागाला वाकवून डोकं गुडघ्याला लावावं. हातांने पायाचा अंगठा पकडावा. काही वेळ या स्थितीत राहावं. थोडी- थोडी विश्रांती घेत पाच वेळा हे आसन करावं.
धनुरासनमुळं पाठीचा कण लवचिक होण्यास मदत मिळते. हे आसम करताना पोटावर झोपावे व कपाळ जमिनीवर ठेवावे. दोन्ही पाय एकमेकांजवळ आणा त्यानंत पाय गुडघ्यात दुमडा. डोके वर उचलून हनुवटी जमिनीवर ठेवावी. उजव्या आणि डाव्या हातांनी पायाचे घोटे धरावे. हे आसन करताना हात कोपऱ्यात वाकवू नये. यामध्ये शरिराचा सर्व भार पोटावर येतो. पाच वेळा हे आसन करा.
मासिक पाळीच्या दिवसांत कंबर, पाठदुखीचा त्रास असह्य होतो, करा ‘ही’ 4 योगासने
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -