ताजी बातमी ऑनलाईन टीम
इंडियन प्रमिअर लिगमध्ये चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा विजय मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडली. सोमवारी मध्यरात्रीनंतर पार पडलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर धोनी थेट मुंबईत दाखल झाला. त्याने कोकिलाबेन रुग्णालयात जाऊन गुडघ्याची चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर 1 जून रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं क्रिकबझने म्हटलं होतं. आयपीएल 2023च्या पहिल्याच सामन्यामध्ये धोनीच्या पायाला दुखापत झाली होती.
पंतवर ज्यांनी उपचार केले त्यांचाच घेतला सल्ला
कोकिलाबेन रुग्णालयातील स्पोर्ट्स मेडिसीनचे निर्देशक डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्याकडे धोनीने कन्सल्टन्सी घेतली असं क्रिकबझच्या वृत्तात म्हटलं होतं. पारदीवाला यांनीच डिसेंबर महिन्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर उपचार केले होते. पादरीवाला हे क्रिडा क्षेत्राशीसंबंधित हाडांच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीवर पार पडली शस्त्रक्रीया! मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात धोनी ऍडमिट
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -