ताजी बातमी ऑनलाईन टीम
लिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आलिया भट्टच्या जवळच्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे सध्या भट्ट कुटुंबीय दु:खात आहे. आलिया भट्टचे आजोबा आणि आलिया भट्टची आई सोनी राजदान यांच्या वडिलांचे म्हणजेच नरेंद्र नाथ राजदान यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. खुद्द आलिया भट्टनं याविषयी खुलासा केला आहे. आलियानं इन्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये आलिया भट्टनं आपल्या आजोबांविषयीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. आलिया भट्ट ज्याप्रमाणे एक उत्तम अभिनेत्री आहे. त्याचप्रमाणे तिची आई म्हणजेच रणबीर कपूरच्या सासूबाई सोनी राजदान याही एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सध्या आलिया भट्टची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. आलियानं या पोस्टमध्ये लिहिलंय की, माझे आजोबा. माझे हिरो. 93 व्या वर्षापर्यंत तुम्ही आमच्यासोबत होतात. खूप गोल्फ खेळात. त्याचबरोबर उत्तम क्रिकेटही खेळलात. तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि नातवंडांसोबतही खूप खेळला होतात. तुम्ही सर्वात उत्तम ऑमलेट बनवायचात. कुटुंबावर आणि आयुष्यावर प्रचंड प्रेम करणारे माझे प्रिय आजोबा…
माझं हृदय हे गहिवरून आलंय परंतु मी खुशही आहे. तुम्ही आम्हाला खूप काही जगायला शिकवलंत. आलियाचे आजोबा हे आजारी असल्याचे तिनंही नमूद केले होते. यावेळी आयफियाचा मोठा सोहळा दुबईत पार पडला होता परंतु यावेळी आलिया मात्र या सोहळ्याला उपस्थित राहू शकली नव्हती. त्यादरम्यानच आलियाचे आजोबा हे हॉस्पिटलमध्ये भरती होते त्यामुळे आलियाला या वेळेचा आयफा पुरस्कार अडेंट करता आला नव्हता. यावेळी आलिया आयफाला का नाही याबद्दल अनेकांनाच प्रश्न पडले होते.
Alia Bhatt च्या कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -