Monday, July 28, 2025
Homeसांगलीसांगली हादरली! अल्पवयीन मुलीचं भररस्त्यात अपहरण, अत्याचार करत धारदार शस्त्राने वार

सांगली हादरली! अल्पवयीन मुलीचं भररस्त्यात अपहरण, अत्याचार करत धारदार शस्त्राने वार

सांगलीमध्ये काळजात धडकी भरवणारी एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मिरज येथे आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. इतकेच नाही तर नराधमाने तिचा गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.( Crime News)

प्रसाद (वय 20) राहणार ब्राह्मणपुरी मिरज या नराधमावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता रस्त्याने जात असताना रिक्षातून तिचे अपहरण करण्यात आले. तसेच मिरजेतील एका ठिकाणी तिच्यावर अत्याचार करून तिच्या गळ्यावर कटरने वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर अल्पवयीन पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पीडित मुलीला नातेवाईकांनी उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलध्ये दाखल केले आहे. सांगली शहर पोलिसात नराधम प्रसाद मोतुगडे माळी याच्याविरोधात अपहरण पोक्सो ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -