Thursday, February 6, 2025
Homeक्रीडाजगावेगळी लग्नपत्रिका, पठ्ठ्याने थेट लग्नपत्रिकेवर धोनी याचा फोटो छापला; कोण आहे हा...

जगावेगळी लग्नपत्रिका, पठ्ठ्याने थेट लग्नपत्रिकेवर धोनी याचा फोटो छापला; कोण आहे हा बहाद्दर?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अभिनेते आणि क्रिकेटपटू यांच्या फॅन्स जगाच्या कानाकोपऱ्यात असतात. त्यांच्या फॅन्सचं वेडही जगजाहीर आहेच. काही फॅन्स तर असं काही करतात की अरे आता स्वत:ला आवर… असं करू नको, असं सांगण्याची वेळ सेलिब्रिटींवरही येते. आता प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी याच्या फॅनने असं काही केलं की त्याची चर्चा संपूर्ण सोशल मीडियात सुरू आहे. धोनीच्या या फॅनने त्याच्या लग्नपत्रिकेवर स्वत: ऐवजी धोनीचा फोटो छापला. ही लग्नपत्रिका तुफान व्हायरल होत आहे. लग्नपत्रिकेवर धोनीच्या फोटोसहीत त्याचा जर्सी नंबर आणि नावही प्रिंट केलं आहे. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या तरुणाने हा पराक्रम केला आहे. त्यामुळे तो आणि त्याची लग्नपत्रिका चर्चेचा विषय बनली आहे.



तुम्ही अनेक लग्नपत्रिका पाहिल्या असतील. त्या लग्नपत्रिकेवर नवरदेव-नवरीचं नाव, त्यांच्या आईवडिलांचं नाव, कुटुंबीयांचं नाव आणि लग्नाची तारीख, हळदीचा कार्यक्रम, ठिकाण आणि वेळ या सर्व गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. लग्नपत्रिकेतील क्रिएटीव्हिटीही पाहिली असेल. या लग्नपत्रिका सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. काही लग्नपत्रिकांची चर्चाही होत असते.

या व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिका पाहून हसू आवरणेही कठिण होतं. आजवर तुम्ही लग्नपत्रिकेवर नवरदेव नवरीचा फोटो पाहिला असेल. पण एखाद्या व्यक्तीने आपल्या लग्नपत्रिकेवर दुसऱ्याचा फोटो छापलेला पाहिला आहे काय? तसा विचारही कोणी करू शकत नाही. मात्र छत्तीसगडच्या या पठ्ठ्याने ही करामत केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

लग्नाचं निमंत्रण
या लग्नपत्रिकेवर महेंद्रसिंह धोनीचा फोटो आहे. त्यासोबत धोनीचं नाव आणि त्याचा जर्सी नंबरही छापण्यात आला आहे. दीपक पटेल असं या धोनीच्या फॅनचं नाव आहे. तो मिलुपाराच्या कोंडकेल जिल्ह्यातील रहिवासी आहे. लग्नपत्रिकेवर केवळ धोनीचा फोटो छापून तो थांबला नाही. तर त्याने धोनीला चक्क लग्नाला येण्याचं आमंत्रणही पाठवलं आहे. त्यामुळे त्याच्या या धोनीप्रेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. दीपक हा लहानपणापासूनच धोनीचा जबरा फॅन आहे. तो धोनीला आपला आदर्श मानतो. त्यामुळेच त्याने आपल्या लग्नपत्रिकेवर धोनीचा फोटो छापल्याचं सांगितलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -