ताजी बातमी ऑनलाईन टीम
सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जातं. सचिनने त्याच्या खेळाच्या जीवावर संपूर्ण जगभरात स्वतःचं नाव कमावलं. त्यांच्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड्स स्वतःच्या नावे केले. दरम्यान आता चाहते अशीच कामगिरी त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर करेल अशी आशा बाळगून आहेत. नुकतंच अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केला आहे.
मुंबई इंडियन्सकडून अर्जुनने केवळ 4 सामने खेळले आहेत. या सामन्यामध्ये अर्जुनने 3 विकेट्स घेतले आहेत. दरम्यान यावेळी सचिनने अर्जुनबाबत एक खुलासा केला आहे.
अर्जुन तेंडुलकर गेल्या जवळपास 3 वर्षांपासून आयपीएलमध्ये डेब्यूची प्रतिक्षा करत होता. यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर अर्जुनचा मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. यावेळी अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकरसोबत बहीण सारा तेंडुलकर देखील स्टेडयममध्ये उपस्थित होते.
मात्र यावेळी सचिन तेंडुलकर डगआऊटमध्ये बसून नाही तर ड्रेसिंग रूममध्ये बसून पडद्याच्या मागून सामना पाहत होता. सचिनने असं का केलं याचं उत्तर अखेर त्यानेचं दिलं आहे.
सचिन तेंडुलकर याविषयीचा किस्सा शेअर करताना म्हणाला, ज्यावेळी मी लहान होतो तेव्हा माझं कुटुंब माझी फलंदाजी पाहण्यासाठी यायचे. तेव्हा माझ्या कुटुंबातील व्यक्तींना सतत मोठ्या स्क्रिनवर दाखवलं जायचं. मात्र असं झाल्याने मी नर्वस व्हायचो आणि माझा खेळ चांगला व्हायचा नाही.
सचिन पुढे म्हणाला, ज्यावेळी मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने डेब्यू केला तेव्हा माझी इच्छा नव्हती की, त्याला देखील माझ्यासारखा अनुभव यावा. त्याचा खेळ चांगला व्हायला हवा होता. त्यामुळे मी ड्रेसिंग रूममध्ये होतो.
जे माझ्यासोबत झालं ते अर्जुनसोबत व्हायला नको…! मुलाबाबत सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -