Monday, July 28, 2025
Homeराजकीय घडामोडीशिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही छोटेखानी? भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना...

शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही छोटेखानी? भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता

राज्यातील सत्तांतराला लवकरच पूर्ण होणार आहे. शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीनंतर महाविकास सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र,मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त काही मिळाला नाही. मात्र आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार हा छोटेखानी असेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतूनच तसे आदेश शिंदे-फडणवीस यांना देण्यात आली आहे मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्याची महामंडळावर होणार बोळवण?
सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळीमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराजी असल्याची चर्चा आहे. तसेच याच मुद्द्यांवरुन विरोधकांकडून देखील सातत्यानं या सरकारवर टीका केली जात आहे. पण आता लवकरच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.

सध्याच्या मंत्रीमंडळ विस्तारत भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तसेच जी उरलेली 13 रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय. विशेष बाब म्हणजे हा छोटेखानी विस्तार केल्यानंतर काही इच्छुकांची महामंडळावर बोळवण होऊ शकतेशिवसेनेच्या वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

मूळ शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीनंतर गेल्या वर्षी जून महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं. गेल्या 11 महिन्यांपासून शिंदे-फडणवीसांसह मंत्रिमंडळातील त्यांचे 19 सहकारी राज्याचा कारभार चालवतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन त्यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा, असं मत मुख्यमंत्री शिंदेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं समजतं. त्याचा अर्थ राज्यात 19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून करण्यात येईल. भाजपच्या महाराष्ट्रातल्या मिशन फोर्टी फाईव्हला लाभदायक ठरू शकतील अशा नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -