Monday, July 28, 2025
HomeसांगलीMiraj crime: शाळेत घेऊन जातो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मित्राला तीस...

Miraj crime: शाळेत घेऊन जातो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मित्राला तीस वर्षाची शिक्षा

Miraj : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मारुती शंकर झोरे (५०, मिरज) यास न्यायालयाने दोषी ठरवून तीस वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात ऑगस्ट २०२० मध्ये पीडितेला अकरावीच्या प्रवेशासाठी शाळेमध्ये घेऊन जात आहे, असे सांगून आरोपी झोरे याने तिला वैद्यकीय तपासणीसाठी मिरजेतील एका पॅथॉलॉजी सेंटर येथे नेले. तपासणीनंतर पीडिता गर्भवती असल्याचे लक्षात आले.

अधिकाऱ्यांनी आरोपी झोरे याच्याकडे पीडितेच्या वयाबाबत चौकशी केली असता त्याने तिचे वय १८ हून अधिक असल्याचे सांगितले. मात्र तिच्या वयाबाबत शंका आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत कल्पना दिली. पोलिस चौकशीत पीडितेने तिच्या मित्राविरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे निष्पन्न झाले.

मिरज शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेला गर्भवती असल्याचा अहवाल व तिच्या तक्रारीमध्ये पोलिसांना तफावत आढळून आली. तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी तिच्याकडे चौकशी केली असता पीडितीने आरोपी मारूती झोरे यानेच अत्याचार केल्याचे.तसेच त्यानेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीचे नाव सांगण्यास सांगितले. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे पीडितेने ही घटना कुणालाही सांगितली नव्हती. तिच्या जबाबावरून अखेर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात (Miraj Police) आरोपी मारुती झोरेविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -