शहरातील संजयनगर परिसरात असणाऱ्या बालाजीनगर मधील एका डॉक्टरांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी घरफोडी केली. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ६ लाख ४० हजारांचे सोन्याचे आणि हिन्यांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सदर घरफोडीची घटना ही गुरुवार दि. ९ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी डॉ. प्रियदर्शन चितळे यांचे भाचे सौरभ संजय मराठे (वय ३४ रा. मिरज) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, डॉ. प्रियदर्शन चितळे
सांगलीत डॉक्टरांचा बंगला फोडला
बुधवार दि. ७ जून रोजी बंगल्याला कुलूप लावून त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी राजस्थानला गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्यावर पाळत ठेऊन गेटचे कुलूप आणि ‘दरवाजाला लावलेले कुलूप कटावणीने तोडून आत प्रवेश केला.
हे आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील बालाजीनगर मधील गेट नंबर चारजवळ असणान्या त्यांच्या विजयश्री बंगल्यात राहतात. डॉ. चितळे हे
बेडरूममध्ये असणान्या कपाटातील शोकेस मध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने, डायमंड पैंजण, सॅमसंगचा टॅब, एक मोबाईल आणि रोख १५ हजार रुपये असा एकूण ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले
गुरुवार दि. ८ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर घरफोडीची घटना उघडकीस आली. घडलेल्या या प्रकारानंतर डॉ. चितळे यांचे भाचे सौरभ मराठे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना केल्या.