Sunday, July 27, 2025
HomeसांगलीSangli: महामार्गावर भरधाव कारची दुभाजकाला जोराची धडक अपघातात चालकासह दोघे ठार

Sangli: महामार्गावर भरधाव कारची दुभाजकाला जोराची धडक अपघातात चालकासह दोघे ठार

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (Ratnagiri-Nagpur National Highway) नरसिंहगाव (ता.कवठेमहांकाळ) गावानजीक भरधाव चारचाकी वाहनाची दुभाजकावर जोराची धडक बसून झालेल्या अपघातात चालकासह दोन जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.

महंमद अरपिल पठाण (वय ३०), इराना सदाशिव हंगरगे (वय २४) दोघे रा. अलमेल ता. सिदगी जि. विजापूर (कर्नाटक) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. हा अपघात (Car Accident) शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.याबाबत अधिक अशी, की चारचाकी वाहन (क्रमांक एम. एच.०३ सी.एम.९५९७) या चारचाकी वाहनामधून मिरजहून त्यांच्या अलमेल (ता. सिंदगी) गावी निघाले होते.

दरम्यान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नरसिंहगाव येथील गावानजीक आले असता, कवठे महांकाळकडं जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर असलेल्या दुभाजकाला जोराची धडक बसली.याबाबत अधिक अशी, की चारचाकी वाहन (क्रमांक एम. एच.०३ सी.एम.९५९७) या चारचाकी वाहनामधून मिरजहून त्यांच्या अलमेल (ता. सिंदगी) गावी निघाले होते.

दरम्यान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नरसिंहगाव येथील गावानजीक आले असता, कवठे महांकाळकडं जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर असलेल्या दुभाजकाला जोराची धडक बसली.यात महंमद पठाण व इराणा हंगरगे हे दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला (नाव समजू शकले नाही). या गंभीर जखमीला मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला असून यात वाहनाचं मोठं नुकसान झालं

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -