Friday, February 23, 2024
Homenewsफेसबुक कडून उद्योग-धंदा वाढवण्यासाठी छोट्या व्यवसायीकांसाठी 50 लाखांपर्यत कर्ज;

फेसबुक कडून उद्योग-धंदा वाढवण्यासाठी छोट्या व्यवसायीकांसाठी 50 लाखांपर्यत कर्ज;

जर तुम्ही छोटे व्यवसायीक असाल तसेच तुमचा उद्योग वाढवण्यासाठी कर्जाच्या शोधात असाल तर, तुम्ही फेसबुक पासून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. तेही विना तारण! हे कर्ज तुम्हाला 5 वर्किंग दिवसांत मिळू शकते.

या कंपनीसोबत भागीदारी
आमची सहयोगी वेबसाईट झी बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार सोशल मीडिया सेक्टरमधील दिग्गज कंपनी फेसबुकने कर्ज क्षेत्रात आता पाऊल ठेवले आहे. कंपनीने भारतातील छोट्या व्यवसायीकांसाठी स्मॉल बिझनेस लोन इनिशिएटीवची घोषणा केली आहे. फेसबुकने या स्कीमसाठी फायनान्स कंपनी इंडिफी सोबत भागीदारी केली आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत कर्ज या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल.

50 लाखांपर्यंत कर्ज
फेसबुक इंडियाचे(facebook India) उपाध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक अजित मोहनने सांगितले की, या योजनेचा उद्देश छोट्या व्यवसायीकांना कोणतेही तारण न ठेवता कर्ज पूरवठा करणे होय. त्यांनी म्हटले की, फेसबुक प्लॅटफॉर्मवर जाहिरात देणाऱ्या उद्योजकांसाठी 5 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत कर्ज घेता येईल. या कर्जावर 17 ते 20 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. अप्लाय करणाऱ्यांना इंडिफी लोन एप्लिकेशनवर कोणतीही प्रोसेसिंग फी लागणार नाही.

5 दिवसांच्या आत मिळणार कर्ज
प्रबंध निर्देशकांनी म्हटले की, आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर 5 दिवसांच्या आत इंडिफी कंपनी अर्जदाराला कर्ज प्रदान करेल. महिला व्यवसायीकांना या कर्जाच्या व्याजदरात 0.2 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -