Tuesday, April 23, 2024
Homenewsचीनला प्रत्युत्तर, भारताच्या मोठ्या तोफा लडाखमध्ये तैनात

चीनला प्रत्युत्तर, भारताच्या मोठ्या तोफा लडाखमध्ये तैनात


चीनने सीमेवर सैन्याची मोठ्या प्रमाणात जमाजमव केल्याने भारत – चीनमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. आता भारताच्या मोठ्या तोफा लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही आपल्या हालचाली गतीमान केल्या आहेत. चीनच्या युद्धखोरीमुळे आर्मी लडाखमध्ये युद्धसज्ज आहे. भारताने 105 मिमी तोफ, बोफोर्स, M777, रॉकेट सिस्टीम तैनात केली आहे.

चीनने LAC वर तैनात केले 50 हजारांहून अधिक जवान
चीनच्या युद्धखोर नीतीला तोंड देण्यासाठी इंडियन आर्मी सज्ज आहे. लडाखमध्ये कोणत्याही संकटाला तोंड देण्याची भारताची तयारी आहे. भारताचा तोफखाना मोठ्या प्रमाणात लडाखमध्ये तैनात करण्यात आला आहे. भारताच्या 105 मिमी फील्ड गन्स, बोफोर्स, ब्रिटीश बनावटीच्या हलक्या वजनाच्या M777, रॉकेट सिस्टीम्स सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. चीनने कोणतेही पाऊल उचलले तर चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच भारताचे रणगाडेही सज्ज ठेवण्यात आलेत.
दरम्यान, चीनने सीमेवरील युद्धाला शह निमंत्रण देण्यासारखी कृती सुरु केली आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) आपल्या भागात 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केल्यानंतर चिनी सेना (Chinese Army) मोठ्या प्रमाणावर ड्रोन (Drone) वापरत आहे. हे ड्रोन भारतीय चौक्यांजवळ उडविण्यात येत आहेत. अधिकृत सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) ड्रोन (Drone) हालचाली बहुतेक दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागात दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -