Friday, November 22, 2024
Homenewsचौकशीला सहकार्य, शपथ ! मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केले नाही ;...

चौकशीला सहकार्य, शपथ ! मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केले नाही ; अनिल परब


ईडी चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार आहे. याआधीही चौकशी झाली आहे. मात्र, आता मला का बोलावण्यात आले आहे, याची माहिती नाही. मी चौकशीदरम्यान सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरं देणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ( Anil Parab) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्याचवेळी त्यांनी ‘शिवसेना प्रमुखांची आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगितले, मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही’, असे ते म्हणाले.

मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. ईडीसमोर जाण्याआधी अनिल परब यांनी देवाचं दर्शन घेतले. दरम्यान, ईडी कार्यालयात जाण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात चौकशी करण्यासाठी अनिल परब यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल परब यांना 20 कोटी रूपये मिळाल्याचा निलंबित पोलीस अधिकारी आरोप सचिन वाझे याने केला होता. त्याकरिता ईडी परब यांची चौकशी करणार आहे.
माध्यमांबोलताना परब म्हणाले, दोन समन्स बजावण्यात आले आहेत. अद्याप त्यांनी मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला माहिती नाही. चौकशीत माझी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असेल, असे ते म्हणाले. पहिल्या समन्सनंतर देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. मात्र, दुसऱ्या समन्समध्ये त्यांना मंगळवारी 28 सप्टेंबर रोजी अर्थात आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनिल परब चौकशीसाठी हजर झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -