बेरडमाची (ता. वाळवा) येथील बांधकाम कामगार बाजीराव मोहन पाटोळे (वय 42) यांचा खून मित्रानेच केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी पोलिसांनी अजय ऊर्फ महादेव शहाजी चव्हाण (वय 22, रा. बेरडमाची) याला अटक केली. अनैतिक संबंधातून बाजीराव हे सारखे चिडवत असल्याच्या रागातून हा खून केल्याची कबुली चव्हाण याने दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. न्यायालयाने अजय याला बुधवार, दि. 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गुरुवारी सायंकाळी किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) हद्दीतील चौकोनी विहीर परिसरात काकासो कदम यांच्या शेतात धारदार शस्त्राने बाजीराव यांचा डोक्यात, कानावर, खांद्यावर वार करून खून केला होता. याप्रकरणी बाजीराव यांचा मुलगा हर्षद याने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
खुनाच्या ठिकाणी कोणताच पुरावा नसल्याने संशयितांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. संशयितांच्या शोधासाठी गेली दोन दिवस पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव, अरविंद काटे, चेतन माने तसेच पोलिस कर्मचारी तपास करत होते. शुक्रवारी रात्री संशयित अजय चव्हाण याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने हा खून केल्याचे कबूल केले.
मृत बाजीराव पाटोळे व संशयित अजय चव्हाण हे दोघे मित्र होते. अजय हा ट्रॅक्टरचालक असून त्याचे गावातीलच एका महिलेशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी ही महिला अजय याला सोडून गेली होती. त्यामुळे बाजीराव हे या कारणावरुन सतत अजय याला चिडवीत होते. याचा राग अजयच्या डोक्यात होता. गुरुवारी हे दोघेजण काकासो कदम यांच्या शेतामध्ये बसले होते. त्यावेळी याच कारणावरुन दोघांच्यात वाद झाला. त्यावेळी अजय याने धारदार शस्त्राने बाजीराव यांच्यावर वार करुन त्यांचा खून केल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.
खबर्यामुळे झाला उलगडा
या खून प्रकरणी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे नव्हते. गेले दोन दिवस पोलिसांचे पथक संशयितांच्या मागावर होते. बेरडमाची गावात पोलिसांनी मुक्कामच ठोकला होता. दरम्यान, बाजीराव याचा मित्र अजय याचे गेल्या दोन दिवसांतील वर्तन काहींना संशयास्पद वाटत होते. त्याचा मोबाईलही बंद होता. ही माहिती पोलिसांच्या खास खबर्याने पोलिस नाईक शरद बावडेकर यांना दिली. संशयावरून अजय याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने या खुनाची कबुली दिली.
सांगली: बेरडमाची मधील खुन मित्राकडूनच
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -