Friday, November 22, 2024
Homenewsनवज्योत सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवज्योत सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा


पंजामधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी मंगळवारी राजीनामा दिला.कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून चरजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात सिद्धू यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.


कॅप्टर अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिद्धू यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरु हाेता. एकाच पक्षात असूनही या दोघांतून विस्तव जात नव्हता.


काही महिन्यांपूर्वी सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील राजकीय लढाईला टोकदारपणा आला होता. त्यातून अमरिंदर सिंग यांना हटवून सिद्धू यांनी पहिली लढाई जिंकली होती. पंजाबचे प्रभारी हरिष रावत यांनी आगामी निवडणुका सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असे सांगून दोन शक्तिकेंद्रे कायम राहतील अशी व्यवस्था केली होती. दरम्यान, मुखमंत्रीपदावरून हटविल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्यापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले होते.

कॅप्टन अमरिंदर सिंग भाजप नेत्यांना भेटणार ?
आज कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीत असून ते भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते. सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजल्यानंतर नवज्योत सिद्धू यांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. यामुळे पंजाबमधील राजकारणाचा दुसरा अंक सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राजीनाम्या संदर्भात सिद्धू यांच्याकडून एक पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना धाडण्यात आलंय. या पत्रात आपण काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून काम करत राहणार असल्याचं म्हटलं आहे. ‘पंजाबचं भविष्य आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्यासोबत कुठलीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे पंजाबच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे’ असंही सिद्धू यांनी या पत्रात म्हटलंय.
पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासोबत अनेक निर्णयांसंबंधी सिद्धू यांचे मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. ‘मी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून काम करत राहणार आहे. पंजाबचं भविष्य आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्यासोबत कुठलीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे पंजाबच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.’
नव्या मुख्यमंत्र्यांशी मतभेद
पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासोबतही सिद्धू यांचे न पटल्याने त्यांच्यातत कुरबुरी सुरू होत्या.
काही निर्णयांसंबंधी सिद्धू यांचे मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा पंजाब काँग्रेसमध्ये रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -