Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाएका डावात 10 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच निधन

एका डावात 10 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच निधन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाने एकाडावात 10 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला गमावलय. पीटर एलन यांचं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी पीटर यांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाच्या वृत्ताने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा झटका बसलाय. 1935 साली क्वीन्सलँड येथे पीटर एलन यांचा जन्म झाला. क्वीन्सलँडसाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

त्यांनी 1965 साली Ashes Series च्या पहिल्या टेस्ट मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता.पीटर एलन यांना ऑस्ट्रेलियासाठी फक्त एक सामना खेळता आला. त्यांच्या पुनरागमनाची गोष्ट मात्र दमदार आहे. शेफील्ड शील्डमधील दमदार प्रदर्शनामुळे त्यांची 1964- 1965 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झाली होती. पण आजारपणामुळे ते टेस्ट मॅच खेळू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी 1965 साली Ashes सीरीजच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये डेब्यु केला. त्यांनी डेब्यु मॅचमध्ये 2 विकेट काढल्या होत्या.एका इनिंगमध्ये 10 विकेट

सीरीजच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पीटर यांना संधी मिळाली नाही. त्यांच्याजागी एलन कोनोली यांना संधी मिळाली. दुसऱ्या टेस्टमधून बाहेर केल्यानंतर पीटर शेफील्ड शील्डमध्ये खेळले. क्वीन्सलँडकडून खेळताना विक्टोरिया विरुद्ध जानेवारी 1966 मध्ये पहिल्याडावात 61 धावा देऊन 10 विकेट काढल्या. ऑस्ट्रेलियामध्ये बेस्ट बॉलिंगचा हा तिसरा रेकॉर्ड होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकाडावात 10 विकेट घेणाऱ्या तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपैकी ते एक होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -