सांगली : सध्या ईडीकडून राज्यात छापेमारीची कारवाई सुरु आहे. मागच्या तीन दिवसात मुंबईतील नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांना ईडीच्या कारवाईने चिंतेत टाकलं आहे. मागच्या तीन दिवसात ईडीने ठाकरे गटाशी संबंधित सुजीत पाटकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापेमारीची कारवाई केली.आता ईडीने आपला मोर्चा सांगलीकडे वळवला आहे. सांगलीमध्ये आज सकाळी ईडीची दोन पथकं आणि 10 अधिकारी यांच्यासोबत सीआरएफचे जवान दाखल झाले. सांगलीतील पारेख बंधू यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. त्यामुळे सांगलीत एकच खळबळ उडालेली आहे.
सांगलीत ईडीची कारवाई कुठे?शिवाजीनगर येथील पारेख बंधूच्या दोन बंगल्यामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. ईडीचे अधिकारी चौकशी करत असलेल्या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात आहेत. सुरेश पारेख आणि दिनेश पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. व्हॅल्यू ऍडेड कर चुकवल्याप्रकरणी सांगलीत पारेख बंधूंवर ईडीची छापेमारीची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या झोन 2 कडून ही कारवाई सुरू आहे. सांगलीत आज सकाळपासून ईडीचे अधिकारी आहेत.
मोठे उद्योजक आणि कॉन्ट्रॅक्टर
ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचा अधिकृत तपशील देण्यास मात्र नकार दिला आहे. सांगलीतील पारेख बंधुंच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पारेख बंधू हे मोठे उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर आहेत.
कुटूंबातील गाड्यांची तपासणी
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून पारेख कुटूंबातील गाड्यांची तपासणी केली जात आहे. सांगलीमध्ये गणपती पेठ येथे सुरेश लाईट हाऊस नावाचे इलेक्ट्रिकल्सचे मोठे दुकान आहे. व्यवसायात आणि आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याच्या संशयावरून ईडीचे पथक दोन्ही बंगल्यात कागदपत्रांची तपासणी करत आहे.
ED च्या कारवाईने सांगलीमध्ये खळबळ, कोणाच्या घरावर पडली धाड?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -