Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगमहिनाभरापूर्वी लग्न झालेल्या तरुणानं नायलॉनच्या दोरीनं घेतला गळफास; का उचललं टोकाचं पाऊल?

महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या तरुणानं नायलॉनच्या दोरीनं घेतला गळफास; का उचललं टोकाचं पाऊल?

महिनाभरापूर्वी लग्न (Marriage) झालेल्या नवविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवार (ता. २२) रात्री ९ च्या दरम्यान दुर्गा कॉलनी गणेशपूर येथे ही घटना घडली असून, प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय २९) असे त्याचे नाव आहे.घटनेची नोंद काकती पोलिस (Kakati Police) स्थानकात झाली आहे. पोलिसांतून समजलेली माहिती अशी, वर्षभरापूर्वी प्रतीक हा सायकलवरून पडला होता. त्यावेळी त्याच्या डोक्याला आणि पायाला मार लागला होता. तेंव्हापासून त्याला आराम वाटत नसे.याच कारणातून काल रात्री ९ च्या दरम्यान घरच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन नायलॉन दोरीने गळफास घेतला. काही वेळानंतर त्याला कुटुंबीयांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -