Wednesday, November 29, 2023
Homeक्रीडाबीसीसीआयचा यू टर्न! एशियन गेम्ससाठी संघ पाठवणार मात्र...

बीसीसीआयचा यू टर्न! एशियन गेम्ससाठी संघ पाठवणार मात्र…

Asian Games 2023 Indian Cricket Team : बीसीसीआयने एशियन गेम्स 2023 मध्ये सहभागी होण्याबाबत नकारघंटा वाजवली होती. मात्र आता आपली भुमिका बदलली असून बीसीसीआय एशियन गेम्स 2023 साठी आपले दोन्ही पुरूष आणि महिला संघ पाठवणार आहे. एशियन गेम्समधील सामने टी 20 फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार भारताचा मुख्य संघ मायदेशात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआय एशियन गेम्ससाठी पुरूषांचा ब संघ पाठवणार आहे. तर भारताचा मुख्य महिला संघ एशियन गेम्समध्ये सहभागी होईल.हांगचोऊ येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला. ही स्पर्धा गेल्या वर्षी होणार होती. मात्र चीनच्या झिरो कोव्हिड पॉलिसीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. जकार्ता येथे 2018 ला झालेल्या एशियन गेम्समधून क्रिकेट वगळण्यात आले होते.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र