Saturday, July 27, 2024
Homeइचलकरंजीप्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने वृद्धेची 53 लाखांची फसवणूक

प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने वृद्धेची 53 लाखांची फसवणूक

प्लॉट व मिळकत खरेदी करण्याच्या बहाण्याने शहरातील रंकाळवेश धोत्री गल्ली येथील विद्यादेवी नेताजीराव जाधव (61) यांची सुमारे 53 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रमेश रघुनाथ पाटील (50) व ऋचा रमेश पाटील (45, रा.या दाम्पत्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यापैकी बांधकाम व्यावसायिक रमेश पाटील याला शुक्रवारी अटक केली.

विद्यादेवी जाधव या ज्येष्ठ महिलेची शहरात मिळकत आहे. ही मिळकत त्यांना विकायची होती. त्यांच्या संपर्कात रमेश रघुनाथ पाटील हा बांधकाम व्यावसायिक आला. त्याने जाधव यांचा विश्वास संपादन केला. ही मिळकत संजय बाबूराव आवटे विकत घेणार असल्याचे पाटील दाम्पत्याने जाधव यांना सांगितले. तसेच खरेदीपत्र करण्यासाठी म्हणून जाधव यांच्याकडून पाच लाख, 44 लाख व चार लाख 47 हजार रुपये अशी रक्कम बँक खात्यावर जमा करून घेतली.

15 जानेवारी 2015 ते 9 नोव्हेंबर 2021 पर्यंत फसवणुकीचा हा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जाधव यांनी संबंधित बांधकामव्यावसायिकाकडे अनेकदा रक्कम परत मागितली. परंतु त्याने ही रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर विद्यादेवी यांनी 25 मे 2023 रोजी फिर्याद दिली. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ए. जी. फाळके यांनी तपास करून यापैकी मुख्य संशयित रमेश रघुनाथ पाटील याला शुक्रवारी अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -