Monday, May 27, 2024
HomeसांगलीNCP नेत्याची गोळ्या झाडून हत्या; आरोपीनं कारागृहातून 22 कॉल करत हलवली खुनाची...

NCP नेत्याची गोळ्या झाडून हत्या; आरोपीनं कारागृहातून 22 कॉल करत हलवली खुनाची सूत्रं, चायना मोबाईलचा वापर

सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणातील सूत्रधार सचिन डोंगरे याने कळंबा कारागृहातून जवळपास २२ मोबाईल कॉल करून खुनाची सूत्रे हलविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.डोंगरे कारागृहातून मोबाईलवरून हल्लखोरांसह अन्य गुन्हेगारांशी संपर्कात होता.

एकच क्रमांक विविध मोबाईलवरून वापरल्याचे तपासात समोर आले. मोका न्यायालयाच्या परवानगीनुसार त्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. विश्रामबाग पोलिसांनी कारागृहाची झडती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे आहे. त्याला अटक केली आहे. तपासातील माहितीनुसार डोंगरे याच्याकडे कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये मोबाईल हॅण्डसेट होता.

त्याच्याकडे सिमकार्डसुद्धा होते. एकच सिमकार्डवरून त्याने तब्बल २२ मोबाईल हॅण्डसेट वापरले आहेत. यावरूनच त्याने खुनाचा कट रचला आहे. तो कारागृहातून संशयित आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.दरम्यान, डोंगरेच्या मोबाईलवरील तांत्रिक माहितीनुसार विश्रामभाग पोलिसांनी काल कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जुना राजवाडा पोलिस ठाणे यांच्या मदतीने संपूर्ण कळंबा मध्यवर्ती कारागृहाची झडती घेतली.

सकाळी साडेनऊपासून सुमारे दीड-दोन तास या पोलिसांना कारागृहाच्या बाहेरच थांबावे लागले, अशी माहिती पुढे आली आहे.त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंत पोलिसांनी कारागृहाची झडती घेतली. त्यानंतर आज सांगली न्यायालयाची परवानगी घेऊन कारागृहात येऊन संशयित सचिन डोंगरे याला दुपारी पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून ताब्यात घेतले.‘कळंबा कारागृहातून कुख्यात गुन्हेगार सचिन डोंगरे याला काल दुपारी ताब्यात घेऊन त्याला अटक केली.

त्याने कारागृहातमधून एकाच मोबाईल सिमकार्डवरून तब्बल २२ मोबाईल हॅण्डसेट वापरल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आम्ही कारागृहाची तपासणी केली. काल सचिनला अटक केली.-संजय मोरे, पोलिस निरीक्षक, विश्रामभाग पोलिस ठाणेचायना मेड मोबाईल हॅण्डसेट … ‘चाकोटा’‘चाकोटा’ हा चायना मेड मोबाईल हॅण्डसेट संशयित आरोपीने वापरल्याची माहिती पुढे आली आहे. हा मोबाईल हॅण्डसेट हाताच्या मधल्या बोटाच्या आकारा एवढाच असल्यामुळे तो सहज कोठेही लपविणे शक्य होते. त्यामुळे कारागृहात वापरण्यात आलेले सर्वच मोबाईल हॅणडसेट हे चाकोटा या चायना मेड कंपनीचे असल्याचे सांगण्यात येते.

यापूर्वी देखील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झडतीदरम्यान १५ मोबाइल हॅण्डसेट मिळाले होते.कारागृहाची ढिसाळ सुरक्षा व्यवस्थाकारागृहातील अधिक सुरक्षेचे ठिकाण म्हणून आरोपींना अंडासेलमध्ये ठेवले जाते. कळंबा कारागृहात थेट मोबाईल हॅण्डसेटचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर एक सिमकार्ड आणि २२ हॅण्डसेटचा वापर झाला आहे. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा किती ढिसाळ आहे हे दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -