ताजी बातमी ऑनलाईन टीम
मान्सूनचं मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये आगन झालं आहे. पुढील 48 तासांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. असं असतानाच आज सकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘वर्षा’ बंगल्यातून बाहेर पडले ते थेट समुद्रकिनारी गेले.
मुख्यमंत्री शिंदेंबरोबर यावेळेस फारसे सुरक्षारक्षक नव्हते की त्यांचा मोठा ताफाही नव्हता. मात्र मुख्यमंत्री शिंदे असे ऑरेंज अलर्ट असताना मोजक्या सुरक्षेसहीत बाहेर का पडले?
मुख्यमंत्री शिंदेंनी आज अचानक केलेला हा दौरा खरं तर सप्राइज व्हिजीट होती. त्यांनी आज (25 जून 2023 रोजी) सकाळी मुंबईतील वरळी येथील कोस्टलमार्गाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट दिली.
वरळीमधील कोस्टल मार्गाचं बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली. या भागात पावसाचे पाणी साचू नये, वाहतूककोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे मुंबई उपनगरातील मिलन सबवेची पहाणी करण्यासाठी पोहोचले. दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून वाहतूककोंडी होते. म्हणूनच शिंदे येथे पहाणीसाठी पोहोचले होते.
सध्या मिलन सबवे भागात पाणी साचलेले नाही, पावसाचे साठलेले पाणी टॅंकरमध्ये जमा करण्यासाठी स्टोरेज टॅंक ठेवण्यात आले आहेत. याचीच पहाणी शिंदेंनी केली.