Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगराज्यात उद्यापासून मुसळधार पावसाचा इशारा,हवामान विभागाचा अंदाज

राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाचा इशारा,हवामान विभागाचा अंदाज

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शेतकऱ्यांसाठी व पावसाची उत्सुकता असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी ऐकून सर्व लोकांमध्ये एक समाधानाचे दृश्य पहायला मिळणार आहे तसेच आपल्या राज्यात पावसाची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मुंबई, पुणेसह अवघा महाराष्ट्र काबीज करीत मान्सूनने अवघ्या २४ तासांत ९० टक्के देश व्यापला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाची लहर पसरली आहे. २६ ते २९ जून दरम्यान राज्यात सर्वत्र मुसळधारेचा इशारा दिला असून कोकणला २६ व २७ रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सून २३ जून रोजी बंगालच्या उपसागरातून थेट विदर्भात दाखल झाला. २४ जुनला त्याने ६० टक्के देश व्यापला होता. रविवारी २५ जुनला अवघ्या २४ तासांत त्याने प्रचंड वेगाने मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यासह ९० टक्के देश व्यापला आहे. मान्सूनचा हा वेग आर्श्वकारक असून आजवर फार कमी वेळा त्याने इतक्या वेगाने देश व्यापला आहे.

मुंबई, पुणेसह राज्यात मुसंडी पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी सांगितले की, मान्सूनने रविवारी मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्य व्यापले आहे. अवघ्या २४ तासांत ९० टक्के देशही व्यापून टाकला आहे. पश्चिमी वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढल्याने हे शक्य झाले. २६ ते २९ जुनपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. २९ जून ते १ जुलै पर्यंत मात्र पावसाचा वेग काही भागात मंदावेल व त्यानंतर तो पुन्हा वेग घेईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -