ताजी बातमी ऑनलाईन टीम
सुपर मार्केटमधील शॉपिंग म्हणजे हजीर तो वजीर प्रकारची असते. म्हणजे तुमच्या हाती चांगली वस्तू लागली आणि तुम्ही ती विकत घेण्याची तयारी दाखवली तर ती तुमची असा काहीसाप्रकार सुपरमार्केटमध्ये अनेकदा दिसून येतो.
खास करुन मर्यादित स्टॉक असलेल्या वस्तूंच्याबाबतीत तर अनेकदा हा प्रकार घडतो. अनेकदा अशा मर्यादीत गोष्टींवरुन वाद झाल्याचंही पहायला मिळतं. कोरोना कालावधीमध्ये युरोपबरोबरच अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये टॉयलेट पेपर्सवरुन अशाप्रकारची फ्री स्टाइल कुस्ती मॉलमध्येच झाल्याचं पहायला मिळालं आहे.
भारतातही अनेकदा असे प्रकार घडतात. आता अशी हमरीतुमरी होणं काही नवं नाही. मात्र भारतीयांनी अशाप्रकारे एखाद्या गोष्टीसाठी परदेशातील सुपरमार्केटमध्ये वाद घातल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना? मात्र खरोखर असा प्रकार घडलाय लंडनमध्ये जिथे दोन पाकिस्तानी गटांमध्ये अगदी भारतामधील बाजारांमध्ये कधीतरी पाहयला मिळणाऱ्या हाणामारीप्रमाणे देसी स्टाइल तुफान हाणामारी झाली आणि ती सुद्धा आंबे खरेदीवरुन.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आंब्यांवरुन दोघांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे. लंडनमधील रस्त्यांवर शॉपिंग करत असतानाच दोन गटांमध्ये हा वाद झाला आहे. व्हिडीओमधील वाद घालणाऱ्यांचे लूक आणि वागण्यावरुन हे सर्वजण आशियामधील एखाद्या देशातील नागरिक असल्याचं वाटत आहे. व्हिडीओ शेअर केलेल्या व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार वाद झालेले दोन्ही गट हे पाकिस्तानी आहेत. सुरुवातीला या लोकांमध्ये बाचाबाची होते आणि नंतर हे लोक थेट फळ विक्रेत्याशी वाद घालू लागतात. दुकानदार आधी या ग्राहकांना ओरडतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला विशेष यश येत नाही आणि मग सुरु होते फ्री स्टाइल हाणामारी
आंबे खरेदीवरुन लंडनच्या बाजारात पाकिस्तानी गटांमध्ये तुफान राडा; Video झाला Viral
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -